दहिवदला चोरटे सैराट : एकाच रात्रीत तीन घरे फोडली
Thieves break into Dahiwad: Three houses broken into in one night अमळनेर (14 फेब्रुवारी 2026) : अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे दोन तीन घरे फोडून अज्ञात चोरट्यानी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोटरसायकलसह 68 हजारांचे दागिने चोरून नेले. हा प्रकार 11 रोजी उघडकीस आला.
एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी
भिकुबाई सुखलाल माळी ही महिला 6 रोजी किनगावात गेली असताना 11 रोजी सकाळी सात वाजता भिकुबाई यांचे घर फोडल्याचे लक्षात आले. घरातील पहिल्या खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. मागच्या खोलीतील कपाटाचे कुलूपही तोडलेले आढळून आले.

गावातील प्रतिभा जयवंत भदाणे यांच्यादेखील बंद घराला फोडून घरातील रोख रक्कम चोरीला गेल्याचे समजते तसेच महेंद्र भिका माळी यांच्या घराबाहेर लावलेली मोटरसायकल देखील चोरीला गेली.
चोरट्यानी भिकुबाईच्या घरातून 30 हजार रुपये किंमतीचे 10 ग्राम वजनाचे सोन्याचे मणी, सोन्याच्या बाह्या, तुकडा तसेच 24 हजार रुपये किंमतीची 24 भार चांदी, प्रतिभा भदाणे हिचे चार हजार रुपये रोख आणि 10 हजार रुपये किंमतीची महेंद्र माळी याची मोटरसायकल (एम.एच.19 ए.एल.863) ही चोरून नेली. कल्पेश गोकुळ माळी यांच्या फिर्यादीवरुन ुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.






