भुसावळातील भोळे महाविद्यालयात 17 रोजी एक दिवसीय साक्षरता कार्यशाळा
भुसावळ (16 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग पुरस्कृत, एच.आर.वायकोळे इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, भुसावळ, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ, व दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय महिला आणि युवतींसाठी आर्थिक नियोजन आणि आर्थिक साक्षरता कार्यशाळा मंगळवार, 17 रोजी सकाळी 9.30 ते चार दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, राज्यपाल नियुक्त विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, विद्यापीठ सीनेट सदस्य दिनेश चव्हाण, एच.आर.वायकोळे इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशनचे संचालक
प्रा.डॉ.निखील वायकोळे उपस्थित असतील.

या मान्यवरांचे मार्गदर्शन
यावेळी आर्थिक जागरूकता व उद्दिष्ट निश्चितीवर कुणाल महाजन, गुंतवणुकीची ओळख व संपत्ती निर्मितीवर ओंकार कस्तुरे, आर्थिक सुरक्षितता, विमा व निवृत्ती नियोजनावर प्रा.डॉ.गिरीष कुलकर्णी, स्मार्ट बजेटिंग, बचत व आपत्कालीन निधीवर डॉ.रोहिणी बोडस मार्गदर्शन करतील. उपस्थितीचे आवाहन समन्वयक योगीता वायकोळे, प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी केले आहे.







