!-- afp header code starts here -->

यावल शहरातील देशमुख वाड्यात ई श्रम, मतदान, रेशन, शेतकरी कार्ड दुरुस्ती शिबिर


E-Shram, Voting, Ration, Farmer Card Repair Camp at Deshmukh Wada in Yaval City यावल (17 फेबु्रवारी 2026) : यावल शहरात आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नगरसेवकांच्या पुढाकाराने नागरीकांकरीता शिबिर घेण्यात आले. हे शिबिर वॉर्ड क्रमांक 10 मधील देखमुख वाड्यात झाले. या शिबिरात ई श्रम, मतदान, रेशन, शेतकरी कार्ड नवीन नोंदणीसह दुरुस्तीसाठीचे अर्ज स्विकारण्यात आले.नागरीकांच्या प्रभागात जावून घेण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ 325 लाभार्थ्यांनी घेतला.

भाजपा नगरसेवकांच्या पुढाकारातून शिबिर
यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीच्या यावल नगरपरिषदेच्या गटनेत्या नंदा महाजन, नगरसेवक योगेश चौधरी प्रयत्नातून शासकीय योजनांच्या त्रृटी संदर्भात मोफत शिबिर घेण्यात आले. शहरातील देशमुख वाडा भागात हे शिबिर सोमवारी पार पडले. या शिबिरात ई श्रम कार्ड, नवीन मतदान कार्ड, मतदान कार्ड दुरुस्ती करणे, रेशन कार्ड दुरुस्ती आणि शेतकरी ओळख पत्र आयडी अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. या भागातील 325 नागरीकांनी याचा लाभ घेतला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी नरेंद्र महाराज, नगरसेवक हेमराज फेगडे, रोशन येवले, मुकेश कोळी, चेतन अढळकर, अमोल देशमुख, दीपक चौधरी, अतुल चौधरी, योगेश देशमुख (बापू), जितू कोलते, पराग देशमुख, रितेश बारी, उज्वल कानडे आदी सदस्यांची उपस्थिती होती.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !