यावल भाजपकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाचा निषेध
BJP condemns Congress state president Harshvardhan Sakpal’s statement यावल (17 फेबु्रवारी 2026) : यावल तहसील कार्यालयात भाजपाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी निवेदन देत टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराजाशी तुलना करणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा निषेध केला. तहसीलदारांना निवेदन देत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
भाजपा पदाधिकार्यांचे निवेदन
यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे सोमवारी भाजपाकडून निवेदन देण्यात आले. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हर्षल पाटील, बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, डॉ.कुंदन फेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकक्ष होते, असे वादग्रस्त विधान करून महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा अवमान केला आहे.

दोषी सपकाळांवर हवी कारवाई
इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. केवळ राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांचा अपमान करणे ही काँग्रेसची संस्कृती आहे, असा आरोप यावेळी भाजप सरचिटणीस ज्ञानेश्वर तायडे, भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी यावल नगरपालिका गटनेत्या नंदा महाजन, फैजपूर सभापती जयश्री चौधरी, फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे, चेतन अढळकर, राकेश फेगडे, हेमराज फेगडे, उमेश फेगडे, राकेश कोलते, योगेश चौधरी,दिलीप वाणी, तेजस पाटील, किरण महाजनसह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.







