अजित पवार विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई (17 फेब्रुवारी 2026) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अपघाताबाबत विविध दावे-प्रतिदावे सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे या अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याबाबतची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
काय म्हणाले सुनील तटकरे ?
अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत केली जावई, अशी मागणी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी स्वतः त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार अशा सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजितदादांच्या अपघाती मृत्यू झाला त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले आहे. या पूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. तसे निवेदन आम्ही दिलेले असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे.

उद्या मुख्यमंत्री केंद्राकडे मागणारी करणार!
पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, नि वेदनाची दखल घेत राज्य सरकार उद्या केंद्र सरकारकडे अजितदादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. तसा पत्रव्यवहार केला जाईल. मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तशी पावले उचलली जातील, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण सीबीआयकडे गेले तर कोणती नवी माहिती समोर येते याकडे लक्ष असणार आहे.







