!-- afp header code starts here -->

धुळ्यात व्यावसायीकाला मिठीच्या जाळ्यात ओढत मागितली 20 लाखांची खंडणी : टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

टोळीने अनेकांना गंडवल्याची शक्यता : महिलेसह त्रिकूटाला अटक


Businessman lured into a trap in Dhule, demanded a ransom of Rs 20 lakhs: Gang caught by local crime branch धुळे (19 फेब्रुवारी 2026) : व्यावसायीकाला एकांतात बोलावून त्याचा तरुणीच्या मिठीतील व्हिडिओ व्हायरलची धमकी देत खंडणी उकळणार्‍या टोळीला धुळे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. टोळीच्या माध्यमातून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकेतील संशयीतांमध्ये महिलेसह तिघांचा समावेश आहे.

व्यावसायीकाला मिठी अन् मागितली खंडणी
शहरातील व्यावसायीकाला बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे दोन वाजता एका तरुणीने चर्चा करण्याच्या बहाण्याने देवपूरातील एका घरात बोलावले. त्यानंतर तरुणीने अचानक मागून मिठी मारत व्यावसायीकाचा शर्ट काढला व त्याचवेळी टोळीतील नरेश कांतीलाल गवळी (नरडाणा चौफुली, देवपूर धुळे), रवींद्र अशोक डोंगरे (रा.रमाबाई आंबेडकर नगर, देवपूर, धुळे) तसेच इतर दोन महिला व तीन पुरुष यांनी या नाजूक प्रसंगाचा व्हिडिओ चित्रीत केला.

संबंधित व्हिडिओ व्यावसायीकाच्या मित्र परिवार व नातेवाईकांना पाठविण्याची तसेच बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी देणार नाही, असे व्यावसायीकाने म्हटल्यानंतर त्यास मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर व्यावसायीकाने हिंमत दाखवत घडला प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांच्यापुढे कथन केला.

पोलिसांची दखल : तिघे जाळ्यात
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील महिला अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. देवपूर परिसरात दोन दुचाकींवर उभ्या असलेल्या संशयितांकडे फिर्यादीने ओळख पटवून दिल्यानंतर पोलिसांनी नरेश गवळी, रवींद्र डोंगरे आणि संबंधित तरुणी यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानबद्ध आरोपीने बनवली टोळी
या घटनेतील मुख्य आरोपी नरेश गवळी असून त्याने टोळी बनवली आहे. तरुणींमार्फत पुरुषांना जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि तो व्हायरल करण्याची तसेच बलात्काराची खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळणे हा त्यांचा व्यवसाय असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गवळी याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून तो कठोर कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात दहा महिने स्थानबद्ध असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

आठ आरोपींविरोधात गुन्हा
व्यावसायीकाला ब्लॅक मेल केल्याप्रकरणी संशयीत नरेश कांतीलाल गवळी (नरडाणा चौफुली, देवपूर धुळे), रवींद्र अशोक डोंगरे (रा.रमाबाई आंबेडकर नगर, देवपूर, धुळे), आरोपी तरुणी (संघमा चौक, गोळीबार टेकडी, धुळे) व सोबतच्या दोन अनोळखी महिला व तीन पुरूषांविरोधात देवपूर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, अंमलदार अनिता पवार, शशिकांत देवरे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, पवन गवळी, विवेक वाघमोडे, राहुल गिरी, सुशील शेंडे आदींच्या पथकाने केली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !