!-- afp header code starts here -->

भिगवण अपहरण प्रकरणात ट्वीस्ट : तरुणी म्हणाली, स्वमर्जीने तरुणासोबत पळाली !


Twist in Bhigwan kidnapping case : Young woman says she ran away with young man of her own free will! इंदापूर (20 फेब्रुवारी 2026) :  इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये 17 रोजी तरुणीचे आई व भावासोबत लग्नाची खरेदी करून घरी परत येताना भरदिवसा अपहरण झाले होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती मात्र अपहृत तरुणीने आधी सोशल मिडीयात व्हिडिओ टाकून अपहरण झाले नसल्याचा दावा केला होता तर आता स्वतःहून तरुणी पोलिसात हजर झाली असून आपण स्वतःच आपल्या मित्रासोबत पळून गेल्याचा जबाब दिल्याने हा प्रकार अपहरणाचा नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

काय आहे नेमके प्रकरण
भिगवणमध्ये तरुणीच्या आई व भावाला मारहाण करत त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकण्यात आली व नंतर तरुणीला टेम्पोत टाकून पळवून नेण्यात आले होते. पीडित कुटुंबाने त्यासंबंधीची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार, आरोपी जहीर हारुन शेख व आयान हारुन शेख या दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण नंतर तरुणीने एका व्हिडिओद्वारे आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःच पळून गेल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी सहा पथके रवाना केली होती पण तिचा शोध लागला नव्हता.

प्रियकरासोबत फिरून मध्यरात्री पोलिस ठाण्यात हजर
गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाली. यावेळी तिने दिलेल्या जबाबाद्वारे कथित अपहरणानंतर ती आपल्या मित्रासोबत कुठे-कुठे गेली होती हे स्पष्ट झाले. यासंबंधीच्या माहितीनुसार, ती आपल्या मित्रासोबत श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेली. तेथून ते मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली. तिथे आल्यावर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला. त्यात तिने आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःच्या मर्जीने पळून गेल्याचे नमूद केले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !