!-- afp header code starts here -->

साकेगावातील श्री स्वामीनारायण गुरुकुलात छत्रपती शिवरायांना अभिवादन


Tributes to Chhatrapati Shivaji at Shri Swaminarayan Gurukula in Sakegaon भुसावळ (21 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्था संचालक गोपाळ भगत यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी महाराजांच्या स्वराज्याची व कार्याची माहिती सांगितली.

प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज भोसले आणि माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगितली. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !