भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव 2025-26 उत्साहात


भुसावळ (13 मार्च 2026) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात 12 मार्च व 13 मार्च 2026 रोजी टेक्नोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, खजिनदार संजय नाहाटा यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील, टेक्नोत्सव संयोजक प्रा.हर्षल पाटील, डॉ.स्वाती फालक, प्रा.स्मिता बेंडाळे उपस्थित होते.





प्रास्ताविक संयोजक प्रा.स्मिता बेंडाळे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना टेक्नोत्सव कार्यक्रमाचे महत्व व्यक्त केले. आभार वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ममता पाटील यांनी मानले. टेक्नोत्सव अंतर्गत हॅकेथॉन, पोस्टर प्रेसेंटेशन, क्विज कॉम्पिटिशन, ट्रेजरहंट, फूड अ‍ॅण्ड फन फेस्ट, डान्स, सिंगिंग व फॅशन शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक स्पर्धेचे आयोजन विविध विद्यार्थ्यांनी केले. या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आयोजित करण्यात आल्या.

विविध स्पर्धांमध्ये विजेते विद्यार्थ्यांची नावे
फूड अ‍ॅण्ड फन फेस्ट : पलक चौरसिया, आरती भोई, सलोनी चंदन

भूमी ओचानी, अलिशा खिल्लारे, चेतना बारी, मानसी तलरेजा, फिरदोस

सुजाता इंगळे, निकिता सपकाळे, प्रेरणा सपकाळे, अदिती भोळे

पोस्टर प्रेझेंटेशन : मोहिनी कोल्हे, अक्षरा काळकर, संकेत वारके व मंथन लोंढे

हॅकेथॉन ः योगेश जावळे व अभिजीत झांबरे 2. वैदेही ठाकूर व मानसी कोलते

फोटोग्राफ ः. शिराज खान, प्रणय गुरुचल, सौमित्र बाविस्कर

डान्स कॉम्पिटिशन : श्रृती बारी, हर्षा तायडे, वैष्णवी कोळी

ट्रेजरहंट कॉम्पिटिशन : प्रथमेश अ‍ॅण्ड ग्रुप, पलक चौरसिया अ‍ॅण्ड ग्रुप, इशा सपकाळे अ‍ॅण्ड ग्रुप

सिंगिंग कॉम्पिटिशन : विक्रांत बिराडे, देवारपण भौमिक, राखी अवस्थी

क्विज कॉम्पिटिशन : कशिश सिंग, अंश तायडे, भूमिका लोखंडे, मीताली पाटील, निकिता शुगनी, किर्तिका मेघे.

फॅशन शो कॉम्पिटिशन : प्रणय गुरुचल (किंग), लक्षवरिया मल्होत्रा (क्वीन)

अक्षय चंद्रत, राधिका शर्मा व साक्षी मटकरी

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सचिव डॉ.पूनम महाजन, डॉ.सपना जंगले, प्रा.स्वाती शेळके, प्रा.अर्चना भालेराव, इव्हेंट कॉर्डिनेटर म्हणून प्रा.मेघा चौधरी, प्रा.नंदिनी दायमा, प्रा.एकता बजाज, प्रा.अरवा भारमल, प्रा.नयना चौधरी यांनी काम पाहिले. विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ.रश्मी शर्मा, डॉ.शलाका निकम, डॉ.विद्या पाटील, डॉ.उमेश फेगडे, डॉ.मनोज जाधव, उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील, डॉ.ममताबेन पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी व प्राध्यापकांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !