जळगावातील तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी : धुळ्यातील तरुणाला अटक


Threat to Circulate Obscene Video of Jalgaon Woman: Youth from Dhule Arrested जळगाव (13 मार्च 2026) : जळगावातील 18 वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी धुळ्यातील तरुणाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
जळगावातील पीडीता व संशयित हुजेफा युनुस पिंजारी (वय 19, रा. चाळीसगाव रोड, धुळे) यांची ओळख होती. 19 नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत संशयित आरोपीने पीडित तरुणीचे काही खासगी अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये मिळवले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर दबाव निर्माण केला.





तक्रारीनुसार, बाथरूममधील पीडितेचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात आले होते. तू मला नाही म्हटली, तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन अशी वारंवार धमकी देऊन आरोपीने पीडितेचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, आरोपीने तिला तिचे नग्न फोटो पाठवण्यासाठीही जबरदस्ती केली. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीमुळे पीडित तरुणी प्रचंड दडपणाखाली होती.

अखेर पीडितेने हिंमत दाखवून जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी हुजेफा पिंजारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !