ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटल्याने अपघात : यावल तालुक्यातील मजूर जागीच ठार तर तिघे गंभीर


Accident Caused by Broken Tractor Trolley Angles: Laborer from Yawal Taluka Killed on the Spot; Three Others Critically Injured यावल (15 मार्च 2026) : यावल तालुक्यातील वढोदा या गावाजवळ अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्गावर ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचे अँगल तुटल्यामुळे ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटल्याने या अपघातामध्ये एक वृद्ध ठार झाला असून तीन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी घडला. मयत व जखमी सर्व उत्तर प्रदेशातील बोरवेल कामगार आहेत. या अपघात प्रकरणी उशिरापर्यंत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

असा घडला अपघात
वढोदा, ता.यावल या गावाजवळून अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्ग मार्गस्त होतो या राज्य मार्गावरून शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बोरवेल कामगार एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून यावलकडे येत होते. अचानक धावत्या ट्रक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले आणि अपघात घडला. यात ट्रॉली रस्त्याच्या कडेला कलंडली या अपघातामध्ये मुन्नू सिंह चौहान (62) हे वृध्द ठार झाले तर मुकेश सिंग (45), केशव सुरेश चव्हाण (20) व सुमित कुमार (21, सर्व राहणार उत्तर प्रदेश) हे जखमी झाले.





जखमींना तातळीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉ.तुषार सोनवणे, डॉ.रोहित कोळी, अधिपरिचारीका ज्योत्ना निंबाळकर, जॉन्सन सोरटे यांनी प्रथमोपचार केले. जखमींना अधिक उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले. अपघात प्रकरणी यावल पोलिसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !