यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 42 प्रकरणांचा निपटारा
42 Cases Disposed of at the National Lok Adalat in Yawal Court यावल (15 मार्च 2026) : यावल न्यायालयात शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पॅनल समोर ठेण्यात आलेल्या दाखल पूर्व तसेच फौजदारी आणि दिवाणी एकूण दोन हजार 321 प्रकरणापैकी 42 प्रकरणांमध्ये तडजोडीने निपटारा करण्यात आला. यात 11 लाख 80 हजार 523 रुपये वसूल करण्यात आले. सकाळपासूनच न्यायालयात या राष्ट्रीय लोक अदालत करिता पक्षकारांची व विविध वित्तीय संस्थांच्या अधिकारी वर्गांची गर्दी होती.
यावलला राष्ट्रीय लोकअदालत
यावलला दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार, 14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यात राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथमवर्ग न्या.आर.एस.जगताप यांच्या पॅनलसमोर चालले. पॅनल पंच वकील अॅड.स्वाती पाटील, सरकारी वकील अॅड.भाग्यश्री अहिरराव यांची उपस्थिती होती. या राष्ट्रीय लोक अदालतीत ग्रामपंचायत, बीएसएनएल, विविध बँका, वित्तीय संस्था व राज्य विद्युत वितरण कंपनीचे बिलांचे दाखल पूर्व प्रकरणे तसेच दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे न्याय प्रलंबित एकूण दोन हजार 321 प्रकरण ठेवण्यात आले.




42 प्रकरणांचा निपटारा
या प्रकरणापैकी 42 प्रकरणात निपटारा करण्यात आला व यातून तब्बल 11 लाख 80 हजार 523 रुपये वसुल झाले. स्थानिक वकील संघाचे अॅड.खालीद शेख, अॅड.गौरव पाटील, अॅड.रियाज पटेलसह संपूर्ण स्थानिक वकील मंडळी व विधी सहाय्यक अजय बडे यांच्या माध्यमातून या सर्व दाखल प्रकरणात तडजोेड करिता पुढाकार घेण्यात आला. या संपूर्ण राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयाचे लघू लेखक आर.एस.बडगुजर, आर.व्ही.आमोदकर, एस.आर.तडवी, एस.एस. पठाण, ए.बी.पाटील,एस.एस.झांबरे, पी.व्ही.जाधव, बी.डी.बागुले, जितेंद्र आढावे, डी.जे.पाटील, मनोज सोनवणे सह आदींनी परिश्रम घेतले.