राज्यात युती जळगावात कुस्ती ! कंत्राट वादातून पोलिस ठाण्याबाहेरच दोन गटात राडा

मारहाणीत भाजपाचे आजी-माजी नगरसेवक जखमी


Alliance at the State Level, Brawl in Jalgaon ! Two Factions Clash Right Outside Police Station Over Contract Dispute. जळगाव (15 मार्च 2026) : राज्यातील सत्तेत शिवसेना व भाजपा भाऊ-भाऊ असलेतरी जळगावात मात्र याच भाऊबंदकीत महापालिकेच्या कंत्राट वादातून जोरदार राडा झाला. विशेष म्हणजे पोलिस ठाण्याबाहेरच झालेल्या तुंबळ हाणामारीने जळगावातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. शनिवारी दुपारी जळगाव महापालिकेच्या एका कंत्राटाच्या वादातून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते थेट पोलिस ठाण्यातच एकमेकांना भिडल्याने मारहाणीत भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे आणि माजी नगरसेवक कैलास सोनवणे जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

काय घडले जळगावात ?
महापालिकेच्या एका निविदेवरून भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे आणि शिवसेनेचे राहुल ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास बालाजी पेठ भागात दोन्ही गट समोरासमोर आले. तिथेच दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक होऊन वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटात रस्त्यावरच हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही बाजूचे लोक तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले.





शनीपेठ पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच राडा
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दोन्ही गट पुन्हा एकदा आपसात भिडले. पोलिसांच्या डोळ्यादेखतच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिस ठाण्यातील या अनपेक्षित गोंधळामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

गोंधळ घालणार्‍यांना घेतले ताब्यात
या राड्यामागे केवळ कंत्राटाचा वाद नसून आगामी महानगरपालिका निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत जखमी झालेल्या सोनवणे पिता-पुत्रांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10 संशयीत ताब्यात : पोलिस अधीक्षक
जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी म्हणाले की, महापालिकेतील टेंडर मिळवण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस ठाण्यात गोंधळ घालणार्‍या दोन्ही गटातील 10 जणांना आम्ही ताब्यात घेतले असून, परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !