भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे थ्रो बॉल स्पर्धेत यश
Ahilyadevi Kanya Vidyalaya of Bhusawal Achieves Success in Throwball Competition भुसावळ (17 मार्च 2026) : श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुसुंबा येथे झालेल्या जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाने अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावले. संघाची आता नाशिकमध्ये होणार्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यालयाच्या 17 वर्षे वयोगटातील यांच्या संघानेही थ्रो बॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. खेळाडू विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सोनू मांडे, सचिव उषा पाटील, मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

