वाडे गावात जुन्या आठवणींना उजाळा : माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात 38 विद्यार्थ्यांचा सहभाग
भडगाव (17 मार्च 2026) : वाडे येथे 1981- 1982 वर्षात शिक्षण घेणार्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. निसर्गाच्या सानिध्यात दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा भरल्याचा आनंद असल्याचे मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी व्यक्त होताना सांगितले.
विशेष म्हणजे गेट टुगेदरचा कार्यक्रम दरवर्षी होतो अन या कार्यक्रमाचा खर्चाचा भार एक मित्र उचलतो. यावर्षी प्रा.संजय सुखदेव पाटील (हल्ली धुळे) यांनी कार्यक्रमाचा खर्चाचा भार उचलला होता. हा गेट टुगेदरचा नववा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बालपणीचे मित्र 27 मुले, 11 मुली असे एकूण 38 बालमित्रांंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालपणीच्या शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे दिसून आले.


विशेष म्हणजे हा गेट टुगेदरचा कार्यक्रम माजी विद्यार्थी व उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी राजेंद्र हरी पाटील यांच्या वाडे शिवारातील शेतात झाला. हिरवळीच्या पिके अन हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात हा मेळावा उत्साहात पार पडला.
सुरुवातीस शाळेतील बालपणीच्या मयत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर एकमेकांचा परीचय देत बालपणींच्या अन खोडकर आठवणींना उजाळा मिळाला. असे कार्यक्रम आपले दरवर्षाप्रमाणे सुरू राहतील व गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र जमत आनंद घेत राहू, असे राजेंद्र हरी पाटील, एकनाथ माळी फौजी यांच्यासह मित्रांनी मांडले.
पुढच्या वर्षाच्या गेट टुगेदरचा कार्यक्रमाचा खर्चाचा भार सुभाष भोपाल परदेशी हे करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाला पत्रकार अशोक परदेशी यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.