भोपाळात गोळीबार करून भुसावळात डेरा : आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


After Firing in Bhopal, Accused Takes Shelter in Bhusawal : Nabbed by Bazarpeth Police भुसावळ (17 मार्च 2026) : भोपाळ शहरात गोळीबार करून पुन्हा गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने भुसावळात डेरा मांडून असलेल्या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. शादाब रईस कुरेशी (35, रा.बाग फरहत अफजा, हुजूर सिकंदरी, भोपाल-मध्यप्रदेश) अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 35 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की भुसावळ बसस्थानकाच्या गेटजवळील रिक्षा स्टँड परिसरात एक इसम गावठी पिस्टलसह संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाल्याने डी.बी. पथकाने संशयीताला ताब्यात घेतले. तपासात आरोपीचे नाव शादाब रईस कुरेशी (35, रा. बाग फरहत अफजा, हुजूर सिकंदरी, भोपाल – मध्यप्रदेश) असे असल्याचे समोर आले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी पिस्टल व मॅगझीन जप्त करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.



आरोपीविरोधात भोपाळात गुन्हा
आरोपी भोपाल शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून 14 मार्च 2026 रोजी अशोका गार्डन पोलीस स्टेशन हद्दीत त्याने पिस्टलने एका व्यक्तीवर गोळीबार करीत पळ काढल्याची माहिती समोर आली असून संबंधित अशोका गार्डन पोलीस स्टेशन, भोपाळ यांना सूचित करण्यात आले.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारती काळे, हवालदार विजय नेरकर, अतुल पवार, सोपान पाटील, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत सोनार, जीवन कापडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपुरकर, जावेद शहा, योगेश माळी आणि अमर अढाळे आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !