चोपड्यात धाडसी घरफोडी : चार लाख 86 हजारांचा मुद्देमाल लांबवला


Audacious Burglary in Chopda : Valuables Worth ₹4.86 Lakhs Stolen चोपडा (18 मार्च 2026) : शहरातील अशोक नगर, तारामती नगर आणि इंदिरा नगर भागात बंद घरांचे कुलूप तोडून तब्बल चार लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले शहरात ?
फिर्यादी अनिताबाई ईश्वर धनगर (49, रा.अशोक नगर) या 15 मार्च 2026 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटातून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 86 हजारांचा ऐवज चोरून नेला. अनिताबाईंच्याच घरी नव्हे तर परिसरातील तारामती नगर आणि इंदिरा नगर भागातील इतर बंद घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले.



पोलिसांची धाव
घरफोडीची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अनिताबाई धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.ल तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या मोठ्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !