गोजोर्‍यात मरिमातेच्या बारागाड्याखाली आल्याने दिव्यांग शेतकर्‍याचा मृत्यू


Differently-abled farmer dies after coming under the ‘Baragadi’ of Goddess Marimata in Gojorya. भुसावळ (20 मार्च 2026) : तब्बल 15 वर्षानंतर भुसावळ तालुक्यातील गोजोरा गावात मरोमातेच्या बारागाड्या ओढण्यात येणार असल्याने गुरुवारी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते मात्र बारागाड्या ओढत असतानाच त्याखाली आल्याने दिव्यांग शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील येथे गोजोरा गावात घडली. अशोक बाबूराव कोळी (57) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

अंगावरून गेल्या बारागाड्या
गोजोरा येथे गुरुवारी सायंकाळी मरिमातेच्या बारागाड्या ओढण्यात आल्या. हा सोहळा पाहण्यासाठी शेतकरी अशोक कोळीदेखील आले होते मात्र सायंकाळी 6.30 वाजता बारागाड्या मरीमातेच्या मंदिराकडे जात असताना गर्दीत कोळी हे अचानक खाली पडले व त्यांच्या अंगावरून गाड्यांची चाके गेल्याने त्यांचा करुण अंत झाला.


कुटूंबावर सणाच्या दिवशी आघात
अशोक कोळी हे शेती व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेनंतर मृतदेह भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत भुस्रावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !