चाळीसगावात 38 लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त
धुळ्यासह गुजरातच्या वाहन चालक-मालकाला अटक : रॅकेटचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा
Banned Gutkha Worth ₹38 Lakhs Seized in Chalisgaon चाळीसगाव (20 मार्च 2026) : चाळीसगावात प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक होत असताना चाळीसगाव शहर पोलिसांनपी अन्न व औषध प्रशासन विभागासोबत केलेल्या कारवाईत सुमारे 38 लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. या प्रकरणी गुजरातच्या चालकासह वाहन मालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई ओझर गावाजवळ 18 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ओझर गावाजवळ आयशर (एम.एच.04 एल.क्यू.2543) द्वारे गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणेने धाव घेत वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधीत गुटखा व तंबाखूचा साठा असल्याने वाहन जप्त करण्यात आले. 12 लाखांच्या आयशर वाहनासह तंबाखू व गुटख्याचे वाहन मिळून एकूण 49 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
अन्न व सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोर्हाडे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शहजाद अहमद याकूब मोहम्मद (28, फ्लॅट क्रमांक 404, एवन पॅलेस सोसायटी, वेसमा, जि.नवसारी, गुजरात) व बाळू शिंगाडे (धुळे) यांना 19 रोजी अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप घुले, योगेश मांडोळे, विकास पाटील, दत्तू सावळे, ज्ञानेश्वर पाटोळे, विलास पवार आदींच्या पथकाने केली. या कारवाईत अन्न व औषध प्रशासन जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे , किशोर आत्माराम साळुंखे तसेच वाहन चालक वृषभ संजय चव्हाण यांचाही सहभाग होता.
