मध्य रेल्वेची मोठी कामगिरी : महसूल मिळवण्यात सात तिकीट निरीक्षक ठरले ‘करोडपती’


Central Railway’s Major Achievement: Seven Ticket Inspectors Become ‘Crorepatis’ in Revenue Generation भुसावळ (21 मार्च 2026) :  विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांसह नियमांचे उल्लंघण करणार्‍या प्रवाशांकडून दंड आकारून करून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सात तिकीट निरीक्षक करोडपती ठरले आहेत. सातही कर्मचार्‍यांन रेल्वेला प्रत्येकी एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून दिल्याची माहिती रेल्वे प्रशासनानेदिली आहे.

सात कर्मचार्‍यांनी कमावला एक कोटीहून अधिक महसूल
रेल्वे कर्मचारी निसार खान यांनी कोटी 47 लाख, एस. के. गुप्ता यांनी एक कोटी 16 लाख, के.के.पटेल यांनी एक कोटी दोन लाख, डी. एन. चौधरी यांनी कोट्यवधींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले. याशिवाय डी.के. मीना (खंडवा), गुडू कुमार गुप्ता (भुसावळ) आणि एस. के. दुबे (भुसावळ) या कर्मचार्‍यांनाही प्रत्येकी एक कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवून दिला आहे.


कर्मचार्‍यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे रेल्वे महसुलातील गळती रोखण्यात मोठे यश मिळाले आहे. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा. रेल्वेची बुकिंग खिडकी, एटीव्हीएम, संकेतस्थळ तसेच रेल वन अ‍ॅपद्वारे तिकिट काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !