वरणगाव-भुसावळ रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेने अनोळखी ठार


भुसावळ (21 मार्च 2026) : रस्त्यावरून पायी चालणार्‍या अनोळखी पादचार्‍याला भरधाव ट्रकनेे चिरडल्याची संतापजनक घटना शहरालगतच्या महामार्गावर 19 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6.50 वाजेच्या सुमारास घडली. 35 ते 40 वर्षीय अनोळखीचा या अपघातात मृत्यू झाला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. वरणगावकडून भुसावळकडे येणार्‍या मार्गावर पटेल टी. दुकानासमोर अपघात घडताच चालक पसार झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

अनोळखीचा अपघातात मृत्यू
अशोक लेलॅण्ड कंपनीचा ट्रक (जी.जे.14 एक्स. 8977) ने रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणी याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात 19 मार्च रोजी रात्री 11.28 वाजता असगर खान आयुब खान (30, सत्य साईनाथ नगर, खडका रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !