साकरीत कार आणल्याच्या रागातून तरुणावर हल्ला : आठ आरोपींविरोधात गुन्हा


Youth Attacked Out of Anger Over Bringing a Car to Sakri : Case Registered Against Eight Accused भुसावळ (23 मार्च 2026) : गावात कार का आणली? याचा जाब विचारत संशयीतांनी तरुणाला बेदम मारहाण करीत त्यास विहिरीत ढकलून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आठ आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
सुनील सुरेश तायडे (48, तपतकठोरा, ता. भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा हेमराज तायडे (23) हा साकरी गावात सोमवार, 23 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कार घेवून आल्यानंतर संशयीतांनी वाद घालत त्यास जाब विचारला तसेच खोकली माता मंदिराजवळील प्रवीण जयराम बाविस्कर यांच्या घरासमोर त्याच्यावर हल्ला करून हातातील लाकडी दांडा व फावड्याच्या दांड्याने त्याला मारहाण केली व लाथा-बुक्क्यांनी पाठीवर, हातापायावर, डोक्यावर व खांद्यावर मारून जखमी करीत शिवीगाळ करून विहिरीत फेकून देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.


यांच्याविरोधात गुन्हा
या प्रकरणी संशयीत प्रवीण जयराम बाविस्कर, दिनेश जयराम बाविस्कर, मोहन जयराम बाविस्कर, विकास कौतीक काकडे, सागर प्रभाकर सोनवणे, संजु आत्माराम तोंडे, माधुरी प्रवीण बाविस्कर, सुरेखा मोहन बाविस्कर (सर्व रा.साकरी, ता. भुसावळ). यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !