बांभोरी शिवारात तरुणाची हत्या : समोर आले ‘धक्कादायक’ कारण


Young Man Murdered in Bambhori Area : ‘Shocking’ Motive Revealed धरणगाव (24 मार्च 2026) : बांभोरी शिवारात मोबाईल आणि पैशांच्या वादातून एका 35 वर्षीय तरुणाची चाकू, काठी आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केल्याने असून खुनाने मोठी खळबळ उडाली आहे.

खुनाने उडाली खळबळ
पिंटू अमशा बारेला (35, मूळ रा.वरला, जि.बडवानी, सध्या रा. बांभोरी शिवार) आणि संशयित आरोपी सुनील सिताराम बारेला यांच्यात पैशांच्या आणि मोबाईलच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला होता. आरोपीने आपले पैसे आणि मोबाईल पिंटूकडे मागितले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. 22 मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बांभोरी शिवारातील रेल्वे लाईनजवळील पुलाच्या बोगद्यात आणि लिंबाच्या झाडाखाली आरोपीने पिंटूला चाकू, काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत पिंटूचा जागीच मृत्यू झाला.


आरोपीविरोधात गुन्हा
भांडण सोडवण्यासाठी मृताची पत्नी सखूबाई बारेला आणि साक्षीदार कैलास बारेला हे गेले असता आरोपीने सखूबाई यांचा उजवा हात पिरगळून त्यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सखूबाई बारेला यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून सुनील सीताराम बारेला (देवी दुगानी वरला, जि.बडवानी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !