भुसावळ रेलसिटी इनरव्हील क्लबतर्फे कर्करोगावर जनजागृती


भुसावळ (25 मार्च 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने मंगळवार, 24 मार्च 2026 रोजी डी.एल.हिंदी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये कर्करोग जनजागृती, मासिक पाळी स्वच्छता आणि कॅल्शियम कमतरता या विषयांवर मार्गदर्शनपर प्रकल्प आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रवक्त्या डॉ.किर्ती चांदवडकर यांनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे, उपचार पद्धती तसेच लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर केल्या. तसेच मासिक पाळीदरम्यान स्वच्छता कशी राखावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कॅल्शियमची कमतरता ओळखणे आणि घरगुती उपाय व आहाराच्या माध्यमातून त्यावर कशी मात करता येते याबाबतही त्यांनी माहिती दिली.


या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्रीकृष्ण टेंभुर्णीकर व पर्यवेक्षिका कविता अग्रवाल उपस्थित होते. तसेच क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगीता वायकोळे तसेच सदस्य सुनीता पाचपांडे, मीनाक्षी धांडे, अंजली जोशी आणि अदिती भडंग उपस्थित होत्या. कार्यक्रमास 60 विद्यार्थिनी व त्यांच्या 20 मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !