वरणगावकरांसाठी हतनूर धरणातून 3.528 दलघमी वाढीव आरक्षणाला मंजुरी


नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या पाठपुराव्याची जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांकडून दखल

वरणगाव : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत वरणगाववासीयांना 24 तास पाणी देणारी पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून या योजनेला वाढीव पाणी आरक्षण आवश्यक असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव नगरपरीषद संचालनालय आयुक्त तथा संचालक, वरळी येथे प्रलंबित होता. या संदर्भात नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव कपोले व संबंधीत वरीष्ठ अधिकार्‍यांची बैठक मंत्रालयात घेतली. या बैठकीत वरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी हततनूर धरणातून 135 एलपीसीडीप्रमाणे 3.528 दलघमी इतक्या वाढीव पाणी आरक्षण प्रस्तावाला खास बाब म्हणून मंजुरी देण्यात आली. त्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाढीव पाणी आरक्षण मंजूर झाल्याने वरणगावकरांना नवीन योजनेच्या माध्यमातून मुबलक साठा पाण्याचा मिळणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.


कॉपी करू नका.