भुसावळात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त 9 पासून अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह
भुसावळ (7 एप्रिल 2026) : भुसावळ शहरातील नंदनवन कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह 9 ते 15 एप्रिल 2026 दरम्यान भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे.
सप्ताहात दररोज नित्य स्वाहाकार, विविध याग तसेच श्री गुरुचरित्र वाचन दररोज सकाळी सहा ते आठ दरम्यान होईल.

प्रहर सेवेत महिलांसाठी सकाळी 8 ते रात्री 8 तर पुरुषांसाठी रात्री आठ ते आठ असेल.
बुधवार, 15 एप्रिल रोजी बळी पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन व देवता विसर्जनाने सप्ताहाची सांगता होणार असून भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र, भुसावळतर्फे करण्यात आले आहे.






