धाराशिव हादरले : आधी पत्नीची नंतर मुलीची केली हत्या ; आरोपी स्वतःहून पोलिसात हजर


Dharashiv Shaken : First Murdered Wife, Then Daughter; Accused Surrenders to Police धाराशिव (7 एप्रिल 2026) : कौटुंबीक हिंसाचार आणि घरगुती वादावरुनही जीवघेण्या घटना घडत असताना धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी पत्नीची व नंतर आठ वर्षीय मुलीची कुर्‍हाडीने हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजर झाला आहे. या कृत्यामागील ठोस कारण अद्याप समोरे आलेले नाही.

अज्ञात कारणातून हत्या
अजित वासुदेव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर या घटनेत लिंबाबाई अजित वासुदेव आणि त्यांची कन्या मानसी वासुदेव (8) यांचा या घटनेत मृत्यू झाला. हत्याकांडांच्या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !