दशहतीसाठी कट्टा बाळगणार्या शिरपूरच्या तरुणाला धुळे गुन्हे शाखेकडून अटक
गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त : शस्त्र तस्करी ऐरणीवर
Dhule Crime Branch Arrests Youth from Shirpur for Possessing a ‘Katta’ (Country-made Pistol) धुळे (7 एप्रिल 2026) : दहशत निर्माण करण्यासाठी बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणार्या शिरपूरातील तरुणाला धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी नगावबारी परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साई किशन समोरील सर्व्हिस रोडवर एक संशयित तरुण दहशतीच्या उद्देशाने शस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर सोमवार, 6 रोजी अटक करण्यात आली. राहुल पांडुरंग पाटील (29, रा.वरवाडे, ता. शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक चेतन मुंढे, अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, मयुर पाटील आदींच्या पथकाने केली.






