भुसावळात राष्ट्रनिर्मितीच्या भावनेतून स्केटिंग उपक्रम


भुसावळ (8 एप्रिल 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी यांच्या वतीने सिल्व्हर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी, भुसावळ यांच्या सहकार्याने राष्ट्रनिर्मितीच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी स्केटिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर गीतांच्या तालावर स्केटिंग सादर केले. कार्यक्रमात एकूण 79 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.


भारत माता की जय व वंदे मातरम् अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उर्जेने भारावून गेला. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, एकता आणि राष्ट्रीय अभिमान जागृत करण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

यशस्वीतेसाठी क्लब अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगीता वायकोळे, हेमलता सोनार, सुनीता पाचपांडे व काजल पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !