डोंगरकठोरा विकासोच्या चेअरमनपदी प्रभाकर निळकंठ राणे बिनविरोध निवड


यावल (8 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील डोंगरकठोरे गावातील रहिवासी प्रभाकर नीळकंठ राणे यांची विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाकर निळकंठ राणे हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यावल विभागाच्या विभागीय उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
राणे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण यावल तालुक्यातून तसेच सर्व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रभाकर नीळकंठ राणे हे के. नारखेडे विद्यालयातील केएनसीटीआय संस्थेतील संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील यांचे काका आहेत. त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल संपूर्ण यावल व भुसावळ तालुक्याच्या पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !