यावल तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर


यावल (8 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या विविध कारणे रिक्त असलेल्या सहा जागेवर पोटनिवडणूक जाहिर झाली आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात झाली आहे. 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

न्हावी, पाडळसा,पिळोदे बुद्रुक, गिरडगाव व चिखली खुर्द या गावात पोटनिवडणूक होत आहे. येथे 28 एप्रिल रोजी मतदान होत 29 एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार आहे.


यावल तालुक्यातील विविध कारणांनी रिक्त असलेल्या पाच ग्रामपंचायतीतील सहा जागांसाठी मंगळवारपासून निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. यात मंगळवार , 7 एप्रिलपासुन ते दिनांक 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

या पोटनिवडणुकीत पाडळसा येथील वार्ड क्रमांक 1 मधील अनुसूचित जातीची जागा, न्हावी येथील वार्ड क्रमांक 5 मधील अनुसूचित जमातीची जागा, न्हावी येथीलच वार्ड क्रमांक 3 मधील नामाप्रची जागा, पिळोदे बुद्रुक येथील वार्ड क्रमांक 1 मधील अनुसूचित जमाती स्त्री ची जागा, गिरडगाव येथील वार्ड क्रमांक 3 मधील अनुसूचित जमातीच्या स्त्री ची जागा तर चिखली खुर्द वार्ड क्रमांक 1 मधील सर्वसाधारण जागेवर ही पोटनिवडणुक होत आहे.ग्रामीण भागातील या पोट निवडणुकी करीता तेथील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे.

असा आहे कार्यक्रम
दिनांक 7 ते 13 एप्रिल नामनिर्देशनपत्र दाखल करणे
दिनांक 15 एप्रिल रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाणणी
दिनांक 17 ए्रपिल दुपारी 3 वाजे पर्यंत माघारीस मुदत व त्या नंतर चिन्ह वाटप
दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळ 5 या वेळेत मतदान
दिनांक 29 एप्रिल रोजी यावल तहसिल कार्यालयात सकाळी 10 वाजेला मतमोजणी.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !