क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन


जळगाव (12 एप्रिल 2026) : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर तसेच प्रशासक राहुल गिरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असून आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी मुलींसाठी व वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आणि समतेचा संदेश दिला, असे प्रतिपादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अवलंब करून समाजात शिक्षण, समता आणि बंधुता वाढविण्याचा संकल्प केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !