भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात
भुसावळ (12 एप्रिल 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात शनिवार, 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. सर्व प्राध्यापकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, स्त्रीला स्वाभिमानाने शिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना घरी शिक्षण देऊन शिक्षित केले तसेच सावित्रीबाई फुले यांना सक्षम बनवले अशा क्रांतिवीर महात्मा फुले यांना आम्ही नमन करतो. श्री शिक्षणाचा हक्क समाजात प्रस्थापित केला असे आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.हितेश गुप्ता, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे, प्रा.कविता पांडव, श्री बद्री प्रसाद केवट व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






