महाराष्ट्राचा सूर हरपला : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचे निधन
उद्या दुपारी चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार-आशिष शेलार
Maharashtra Loses Its Voice : Veteran Singer Asha Bhosle Passes Away मुंबई (12 एप्रिल 2026) : तब्बल सहा दशकं इंडस्ट्रीत आपल्या मधूर आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावणार्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (92) यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. उद्या सोमवारी दुपारी चार वाजता शिवाजी पार्कला अंतिम संस्कार होणार आहेत.
वर्सटाईल गायिका
भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळख होती. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत.
उद्या होणार अंत्यसंस्कार
आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. आशाताईंचे सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
महाराष्ट्र दुःखात बुडाला
मंत्री आशिष शेलार म्हणाले, आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशा ताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशा ताईंचे असणे हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचा प्रवास, दुःखाला स्वतः कवटाळून आणि दुसर्याला सुख देण्याचे काम त्यांनी केले होते. त्
अंबादास दानवे यांनी पोस्ट करत वाहिली श्रद्धाजंली
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, स्वरांच्या दुनियेतील अखंड ऊर्जा आणि भारतीय पार्श्वगायनाचा देदीप्यमान तारा म्हणजे ‘आशाताई’! शास्त्रीय बाजाची गाणी असोत किंवा रिदमिक पॉप, आशा भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आणि गाजवत राहणार. त्यांच्या संगीतातील अष्टपैलुत्वाला मानाचा मुजरा! भावपूर्ण श्रद्धांजली.






