भुसावळात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह : दिवसभरात निघणार 40 मिरवणुका


भुसावळ (14 एप्रिल 2026)  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भुसावळ शहर निळेमय झाले असून जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर मंगळवार, 14 रोजी दिवसभरात 40 मिरवणुका निघणार आहे.

मध्यरात्री अनुयायांनी केले अभिवादन
सोमवार, 13 रोजी रात्री 9 वाजेपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर अनुयायांनी गर्दी करून जल्लोष केला. मंगळवारी दुपारपासून शहरातील विविध भागांतून तब्बल 40 मिरवणुका निघणार असल्याने शहरातील स्टेशन रोडवरील चारचाकी व अवजड वाहतूक दुपारनंतर बंद केली जाईल.


जयंती उत्सव समितीतर्फे भरगच्च कार्यक्रम
यंदा जयंती उत्सव समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थान्यची प्रतिकृती साकारली आहे शिवाय उत्सव समितीने मंगळवारी दिवसभरात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

भुसावळ शहर झाले निळेमय
जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जामनेर रोड, यावल रोड, जळगाव मार्गावर रोषणाई करून निळे ध्वज लावण्यात आले आहेत तर स्टेशन रोडवर बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून बसस्थानकापर्यंत तसेच सतारे ब्रीज जक महाराणा प्रताप चौकाससह विविध भागांमध्ये भीमसैनिकांनी आकर्षक रोषणाई केली. जुन्या पालिका ईमारती समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात सुशोभिकरण करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !