भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
भुसावळ (14 एप्रिल 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मंगळवारी सकाळी 7.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.व्ही.पाटील, ऑ.जॉ. सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे, विकास पाचपांडे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.










