भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात


भुसावळ (14 एप्रिल 2026)  : शहरातील के.नारखेडे विद्यालयात मंगळवारी सकाळी आठ वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.पी.पाठक आदी उपस्थित होते.



विद्यालयातील कुणिका बेंडाळे, ज्ञानेश्वरी भोई व कार्तिक शशिकांत झांबरे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यालयातील शिक्षिका शुभांगी पाटील यांनी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यालयातील संगणक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !