भुसावळ विभागात ‘पोषण पखवाडानिमित्त’ आरोग्य जनजागृती

योग सत्र, व्याख्याने, आरोग्य तपासणी शिबिरातून शेकडो लाभार्थ्यांचा सहभाग


भुसावळ (18 एप्रिल 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात 9 ते 23 एप्रिल या कालावधीत‘पोषण पखवाडा’साजरा करण्यात येत असून,या अंतर्गत विविध आरोग्य व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. 13 एप्रिल रोजी विभागीय रेल्वे रुग्णालयात महिला व बालकांसाठी योग या विषयावर विशेष सत्र घेण्यात आले.यावेळी तंदुरुस्ती व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले.फिजिओथेरपी तज्ज्ञांनी सुरक्षित व्यायामाचे मार्गदर्शन करत दैनंदिन जीवनात योग्य सवयींचे महत्त्व स्पष्ट केले.या सत्राचा 168 जणांनी लाभ घेतला.

15 एप्रिल रोजी संस्कृती प्राथमिक शाळेत जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये पोषण पखवाड्याचे महत्त्व सांगताना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहार व चांगल्या सवयी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी उपस्थितांना आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमात 257 जणांनी सहभाग नोंदविला.


16 एप्रिल रोजी याच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिरात विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांचे आरोग्य मूल्यांकन करण्यात आले.वजन मोजमाप, शारीरिक तपासणी व सामान्य आजारांचे निदान करण्यात आले. शिबिरात 21 विद्यार्थ्यांची तपासणी झाली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !