केंद्राने महागाई भत्ता दोन टक्के वाढवला ; कर्मचार्‍यांमध्ये आनंदाची लहर


Centre Hikes Dearness Allowance by Two Percent ; Wave of Joy Among Employees नवी दिल्ली (18 एप्रिल 2026) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीत सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढीला मंजुरी दिली. शनिवार, 18 रोजी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आल्याने 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

60 टक्के झाला महागाई भत्ता
सरकारने महागाई भत्ता 58 टक्क्यावंरून 60 टक्के केला आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता 55 टक्के वरून 58 टक्के करण्यात आला होता. मागील सुधारणा 1 जुलै 2025 पासून प्रभावी मानली गेली होती, ज्याचे पेमेंट थकबाकीसह (एरियर) करण्यात आले होते.


केंद्र सरकार वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता आणि महागाई मदत मध्ये बदल करते. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !