रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची फलश्रुती


रावेर (19 एप्रिल 2026) : रावेर तालुक्यातील एका एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ह प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉ.नितु पाटील आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडली.

शस्त्रक्रिया पूर्णतः विनामूल्य
रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे अनेक ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी अडचणी येत होत्या. खाजगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे 50 ते 80 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, गोदावरी फौंडेशनच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया पूर्णतः विनामूल्य करण्यात आली. मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका या अंतर्गत तालुक्यामध्ये गोदावरी फाउंडेशन मार्फत मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर सुरू आहे.


सर्व नियमांचे पालन
डॉ. नितु पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत दक्षता आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करत ही सर्जरी यशस्वी केली. एचआयव्ही बाधित रुग्णांबाबत समाजात अजूनही भीती आणि गैरसमज आढळतात, मात्र या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे.या शिबिरामुळे गरजू आणि दुर्बल घटकांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, समाजात आरोग्यसेवेबाबत विश्वास वाढण्यास मदत होत आहे.हि शस्त्रक्रिया केवळ वैद्यकीय यश नसून, मानवतेचा जिवंत प्रत्यय देणारी घटना ठरली आहे.

यावेळी डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसके, डॉ. गौरव पाटील,डॉ. दिव्या पोखरणकर डॉ.कीर्ती महाजन, संजय महाजन,सबा ,तृप्ती ,प्रतीक्षा, स्वाती आदी स्टाफ यांनी मदत केली.

सामाजिक भान जोपासले : डॉ.नितु पाटील
सदर महिला ही रावेर येथील मोफत मोतीबिंदू शिबिरातील आहे. तपासणी केल्यावर ती एचआयव्ही बाधित असल्याचे समजले. अशी शास्त्रक्रिया करणे ही अत्यंत जोखमीचे काम आहे पण ही जोखम पत्करल्याशिवाय त्या महिलेला पुनर्दृष्टी देता येणार नव्हती सोबतच आर्थिक विवंचना असल्यामुळे खाजगी मधील 50ते 60 हजाराचा खर्च ती काही करू शकली नसती. त्यासाठी तिला कर्जबाजारीच व्हावे लागले असते. पण ह भ प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाने मात्र आपले सामाजिक भान जोपासत त्या महिलेची मोतीबिंदू शस्त्रक्रिया निशुल्क केली आहे.

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची फलश्रुत
असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी, हे ध्येय समोर ठेवून आम्ही मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका शिबिराची योजना आखली.समाजातील गरीब, वंचित, पीडित नागरिकांना देखील उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी हाच उद्देश शिबिराचा होता. आर्थिक विवंचनेने हतबल असलेल्या एचआयव्ही बाधित महिलेवर झालेली यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हेच या शिबिराची फलश्रुती होय, असे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !