रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : गुरुवारी भुसावळ-वर्धा मेमूसह चार रेल्वेगाड्या रद्द
पारस-अकोलामध्ये रेल्वेचा ब्लॉक : तीन गाड्या विलंबाने धावणार
Attention Railway Passengers: Four Trains, Including the Bhusawal-Wardha MEMU, Cancelled on Thursday.भुसावळ (20 एप्रिल 2026) : भुसावळ विभागातील पारस गायगाव अकोलादरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर ’ऑटोमेटिक ब्लॉक सेक्शन’च्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला असून गुरुवार, 23 रोजी वर्धा मेमूसह चार रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
गुरुवार, 23 रोजी या गाड्या रद्द
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 11121 भुसावळ-वर्धा मेमू, गाडी क्रमांक 61102 बडनेरा-भुसावळ मेमू, गाडी क्रमांक 61101 भुसावळ-बडनेरा मेमू व गाडी क्रमांक 11122 वर्धा-भुसावळ मेमू रद्द करण्यात आली आहे.

तीन गाड्या उशिराने धावणार
रेल्वे ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 20820 ओखा-पुरी एक्सप्रेस शेगांव ते श्री क्षेत्र नागझरी दरम्यान 2 तास 25 मिनिटे नियमन करण्यात येईल तर गाडी क्रमांक 11040 गोंदिया -कोल्हापूर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगांव दरम्यान 2 तास 20 मिनिटे नियमन करण्यात येईल तसेच गाडी क्रमांक 12485 हजुर साहिब नांदेड -श्री गंगा नगर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगांव दरम्यान दोन तास नियमन करण्यात येईल. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल.
पायाभूत सुविधांची देखभाल आणि रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी हा ब्लॉक अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भुसावळ रेल्वे विभागाने केले आहे.


