भुसावळात भगवान परशुराम जन्मोत्सवाचा अपूर्व उत्साह

भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष : जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम


भुसावळ (21 एप्रिल 2026) : शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2026 तर्फे आयोजित भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेची सुरुवात श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष जी.दामले, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

यांची होती उपस्थिती
शोभायात्रेत प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी व जन्मोत्सव समिती 2026 चे अध्यक्ष वेदप्रकाश ओझा, उपाध्यक्ष रोहित कुलकर्णी, सचिव घनश्याम मिश्रा, आदित्य शर्मा, कोषाध्यक्ष देवेश कुलकर्णी, व समस्त ब्राह्मण समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ब्रह्मवृंद व समाज बांधवांचा सहभाग होता. मलकापूर येथील श्रीराम ढोल पथक, अनघा कुलकर्णी यांच्या संचलनाखाली तयार झालेले महिला, मुली व मुलांचे ध्वज पथक, खड्ग पथक व परशुपथक शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले.


शोभायात्रेदरम्यान भुसावळ शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन भगवान परशुरामांचे पूजन केले. माजी आमदार संतोष चौधरी, उद्योगपती मनोज बियाणी, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, बबलू बर्‍हाटे, राहुल तायडे, मुकेश गुंजाळ, दीपक धांडे, नगरसेवक परीक्षीत बर्‍हाटे, नगरसेवक श्रेयस इंगळे आदी मान्यवरांनी शोभा यात्रेची शोभा वाढवली. सर्व मान्यवरांना भगवान परशुरामांचे स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.

भव्य व शिस्तबद्ध शोभायात्रेदरम्यान गोपाल रेस्टॉरंटचे संचालक मयूर अग्रवाल व मितीश अग्रवाल यांनी सरबत वाटप, अग्रसेन चौकात अ‍ॅड.गोकुळ अग्रवाल व संपूर्ण अग्रवाल समाजातर्फे पाणी व कुल्फीचे वाटप, गुजराती स्वीटचे संचालक कपिल मेहता यांच्यासोबत सतीश खडायते यांनी शीतपेयाचे वाटप करून सर्व परशुराम भक्तांना सेवा दिली. शोभायात्रेच्या मार्गात असणार्‍या अग्रसेन चौक, बसवेश्वर प्रतिमा व पुढे महाराणा प्रताप चौकात भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने माल्यार्पण करण्यात आले. मुन्सिपल पार्क येथील राम मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला. या ठिकाणी हजारोंच्या संख्येत भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यांची यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी कैलास उपाध्याय, उमाकांत शर्मा (नमा), अनिरुद्ध कुलकर्णी, भूषण वैद्य, गौरव हिंगवे, भूषण जोशी, अनुप धावडे, प्रशांत उपासनी, धनंजय नाईक, तेजस जोशी, रोहित कुलकर्णी, मंगेश भावे, जयप्रकाश शुक्ला, आशिष तिवारी, आनंद जोशी, खुशाल जोशी, संकेत कुलकर्णी, प्रशांत शर्मा, गोपाळ जोशी, दीपक पाथरकर गुरुजी, श्री राधेश्याम दुबे, प्रवीण मिश्रा, योगेंद्र दुबे, राजेश दुबे, अनिल कुमार तिवारी (लाला भैया), ए.के.तिवारी आदी परशुराम जन्मोत्सव सोहळा समिती पदाधिकारी व सदस्यांनी जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !