दिव्यांग बांधवांच्या हस्ते कर्जत उपकेंद्राचे भूमिपूजन

आमदार अमोल जावळे यांच्या संवेदनशील भूमिकेचा आदर्श


रावेर (21 एप्रिल 2026) : रावेर तालुक्यातील कर्जोद येथे 33/11 के.व्ही. उपकेंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे समाजातील सर्व घटकांचा सन्मान राखत भूमिपूजनाचा मान उच्चशिक्षित दिव्यांग बांधव लीलाधर प्रजापती यांना देण्यात आला तर पूजन त्यांचे वडील प्रजापती सर यांच्याहस्ते करण्यात आले. दिव्यांग बांधवांना सन्मानाची संधी देत आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सामाजिक समावेशकतेचा आदर्श घालून दिला असून त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सावदा विभाग कार्यकारी अभियंता गणेश महाजन यांनी आमदार जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या भागात 5 ते 6 नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाल्याचे नमूद केले.

नंदकिशोर महाजन यांनी आमदारांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जिद्दीचा उल्लेख केला, तर सुरेशभाऊ धनके यांनी शेतकर्‍यांच्या समस्या अल्पावधीत सोडवल्याबद्दल आमदारांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

अ‍ॅड.प्रा.सूर्यकांत देशमुख यांनी कमी-जास्त वीजदाबामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या समस्येवर हा प्रकल्प प्रभावी उपाय ठरेल, असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात आमदार अमोलभाऊ जावळे म्हणाले की, जुनी वीज यंत्रणा बदलून आधुनिक पायाभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक आहे. नवीन उपकेंद्रांमुळे वीजभाराचे योग्य विभाजन होऊन नागरिकांना अधिक दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.

यांची होती उपस्थिती
सुरेश धनके, नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, अरुण शिंदे, राजन लासुरकर, गोमती बारेला, हरलाल कोळी, पी.के.महाजन, वासुदेव नरवाडे, संजय महाजन, वाय.व्ही.पाटील, अ‍ॅड.प्रा.सूर्यकांत देशमुख, सुनील पाटील, रामदास प्रजापती, रवींद्र पाटील, नंदिनी पंत, सी.एस.पाटील, भूषण महाजन, सूर्यवंशी, महमूद मनयार, सुरेश पाटील, पवन चौधरी, सतीश पाटील, मनोज पाठक, आशिष पाठक, मोहन महाजन, नरेंद्र महाजन, रईस आमीर, साजिद शेख, निलेश सावळे, पियुष प्रजापती आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !