धुळ्यातील सेवानिवृत्त सहा.पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रणधीर यांचे निधन


Ravindra Randhir, a retired Assistant Police Sub-Inspector from Dhule, passes away धुळे (24 एप्रिल 2026) : शहरातील वडेल रोड, पोलीस कॉलनी भागातील रहिवासी व पोलीस दलातील सेवानिवृत्त सहा.पोलीस उपनिरीक्षक रवींद्र काशीनाथशेठ रणधीर (61) यांचे गुरुवार, 23 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात धुळ्यातील एकवीरा देवी मंदिरामागील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्व.रवींद्र यांच्या कारकिर्दीला उजाळा देत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

जिल्हाभरात बजावली सेवा : आप्तांसह पोलीस दलातही शोककळा
रवींद्र रणधीर यांनी धुळे जिल्ह्यातील थाळनेर, शिरपूर, पिंपळनेर, धुळे मुख्यालय व वाहतूक शाखेत सेवा दिली व दोन वर्षांपूर्वीच ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असतानाच त्यांची गुरुवारी दुपारी प्राणज्योत मालवली. अत्यंत सुस्वभावी व मनमिळावू सहकार्‍याचे अकाली निधन झाल्याने पोलीस दलातून तसेच आप्तांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली.

स्व.रवींद्र रणधीर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. ते भानुदास रणधीर (सुरत) व सीआयएसएफमधील एएसआय राजेंद्र रणधीर (पुणे) व यांचे मोठे बंधू तर धुळे एस.टी.आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी शंकर जाधव यांचे शालक होत.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !