गो मातेला राष्ट्रमाता घोषित करा ; गो हत्येवर बंदी घाला : भुसावळात गो सेवकांचे आंदोलन


Declare the Cow as the ‘Mother of the Nation’ ; Impose a Ban on Cow Slaughter: Cow Protection Activists Protest in Bhusawal भुसावळ (28 एप्रिल 2026) : गो मातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्यात यावे, देशभरात गोहत्येवर पूर्ण बंदी घालण्यात यावी आणि गोसंरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी भुसावळातील विविध सामाजिक, धार्मिक आणि गोभक्त संघटनांनी भुसावळ तहसीलवर रॅली तसेच मोर्चा काढत तहसीलदार निता लबडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सकल हिंदू समाजातर्फे रॅली काढण्यात आली.

गोहत्येचा तीव्र निषेध
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संस्कृतीत गौमातेचे स्थान अत्यंत पवित्र असून ती केवळ एक पशू नसून भारतीय परंपरा, श्रद्धा आणि कृषीव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. गोमाता ही समस्त ऐश्वर्याची प्रदाता असून कृषी आणि आरोग्य व्यवस्थेचा आधार मानली जाते मात्र आजही देशातील अनेक भागांमध्ये गोवंशाची दयनीय अवस्था असून गोहत्या सुरू आहे.

आंदोलकांच्या अशा आहेत मागण्या
गोमातेला संवैधानिक दर्जासह अधिकृतपणे ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे, देशभरात गोहत्येवर संपूर्णपणे बंदी घालावे तसेच यासाठी कठोर कायदे लागू करून गोवंश संरक्षणाला कायदेशीर बळ द्यावे, निराश्रित गोवंशासाठी योग्य सुविधा असलेल्या गोशाळा उभाराव्यात आणि त्यांना शासनाकडून नियमित अनुदान उपलब्ध करून द्यावे त्यामुळे रस्त्यावर भटकणार्‍या जनावरांची समस्या कमी होईल आणि गोसंरक्षण अधिक प्रभावी होईल.

हजारो स्वाक्षर्‍यांसह निवेदन
हे निवेदन नंदग्राम गोधाम, अंजाळे, श्री राधाकृष्ण प्रभातफेरी, भुसावळ, अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण संघटना, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, अखिल भारतीय जैन संघटना, प्रतिष्ठा महिला मंडळ तसेच इतर समस्त गोभक्त संघटनांच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनासोबत हजारो नागरिकांच्या स्वाक्षरीयुक्त प्रतीही जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

यांची निवेदन देताना उपस्थिती
भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, नगरसेवक बबलू बर्‍हाटे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राध्येश्याम लाहोटी, संतोषकुमार नागला, जयंतीलाल सुराणा, अ‍ॅड.गोकुळ अग्रवाल, उमाकांत शर्मा तसेच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, गो सेवक रोहित महाले, संत गेंदालाल महाराज, विजुजी महाराज, शीतल चौधरी, महिमा कोलते, रितेश जैन, मुकेश गुंजाळ, जीतु जाट, पवन नाले, आदित्य धायडे, कुणाल शिंदे, शुभम रुमकर, भूषण महाजन, उमेश जोशी, अनिकेत पाटील, कृष्णा साळी, चेतन ठाकुर, किरण पाटील, अनिकेत साळी, सौरभ यादव आदींचा उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !