भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत महाराष्ट्र दिनी विविध कार्यक्रम
भुसावळ (30 एप्रिल 2026) : 1 मे जागतिक कामगार दिवस व महाराष्ट्र दिनानिमित ऑर्डनन्स फॅक्टरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनतर्फे करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता कामगारांची प्रभात फेरी आयुध निर्माणी परिसरात काढल्यानंतर युनियन कार्यालयावर झेंडावंदन होईल तर कामगार आंदोलनात शहीद कामगारांना व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या लढाईत शहीद झालेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. 1 मे दिवसानिमित्त अन्य आयोजन युनियन कार्यालय, पोस्ट ऑफिस जवळ आयुध निर्माणी भुसावळ येथे करण्यात आलेले आहे. सर्व कामगारांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम सफल करण्याचे आवाहन फॅक्टरी कामगार युनियन महासचिव यांच्याद्वारे करण्यात आले असल्याचे महासचिव दिनेश राजगिरे कळवतात.

