भुसावळात ‘संस्काराचा अमृतकुंभ’ या पुस्तक संकलन योजनेने वाचन संस्कृती अभियान सप्ताहाची सांगता


भुसावळ (30 एप्रिल 2026) : शहरातील वांजोळा रोडवरील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाद्वारा जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने 23 ते 30 एप्रिल वाचन संस्कृती अभियान सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सप्ताहाची सांगता गुरुवार, 30 एप्रिल रोजी ‘संस्काराचा अमृतकुंभ’ या पुस्तक संकलन योजनेने करण्यात आली.

तर पुस्तकांचे करता येईल दान
संस्काराचा अमृतकुंभ या योजनेत पुस्तकांचे दान देता येणार आहे. योजनेतील पुस्तक मोफत कोणालाही वाचनासाठी दिली जातात. ही संकल्पना भुसावळ येथील प्रोफेसर कॉलनीतील इंजिनिअरसंतोष वसंत पाटील (ह. मु. ठाणे) यांना भावली. त्यांनी त्यांच्याकडील गेल्या 15 वर्षातील वेळोवेळी घेतलेली वाचून झालेली 129 वाचनीय दुर्मिळ पुस्तके ठाणे येथून त्यांचे मोठे बंधू श्रीकांत पाटील यांच्याद्वारा संस्काराचा अमृतकुंभ या योजनेत समर्पण केलीत.

भुसावळ येथील उज्वल सराफ पुस्तक प्रदर्शन पाहण्यास येऊन त्यांचे कडील 31 वाचनीय पुस्तके संस्काराचा अमृतकुंभ यात समर्पण केली. या दोन्हींचे आभार अध्यक्ष प्रमोद सरोदे व कार्यकारी मंडळाने मानले.

कार्यक्रमासाठी प्रमोद सरोदे, अनिल फेगडे, सुरेश कोल्हे, फेगडे, अशोक चौधरी, लक्ष्मण पाटील, किशोर चौधरी, शांताराम पाटील, सुरेश सूर्यवंशी व परिसरातील मुल-मुलींनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !