भुसावळात ऑर्डनन्स फॅक्टरीत कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रम
भुसावळ (2 मे 2026) : शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत लाल झेंडा प्रेरित कामगार युनियनतर्फे 1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी कामगारांची प्रभात फेरी निघाल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले व कामगार आंदोलनात व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रभात फेरीने वेधले लक्ष
परंपरानुसार सर्व कामगार लाल शर्ट व लाल झेंडे हातात घेऊन युनियन कार्यालयावर हजर झाले तेथून सायकल शेड ते ऑर्डनन्स फॅक्टरीत इस्टेटमध्ये कामगारांची भव्य प्रभात फेरी सकाळी आठ वाजता निघाली.
प्रभात फेरीत देशभक्तीपर गाण्यांसोबत महाराष्ट्र गीत, मेहनतकश कामगार गाण्याचा समावेश होता. याप्रसंगी 1 मे दिवस अमर रहे, मई दिवस के शहीद अमर रहे, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन के शहीद अमर रहे अशा घोषणांनी आयुध निर्माणी परिसर दुमदुमला.

मुख्य रॅली झाल्यानंतर प्रभात फेरीचे रूपांतर कामगार भवनात मुख्य कार्यक्रमात झाले. सर्वप्रथम लाल झेंड्याचे ध्वजारोहण युनियनच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या माध्यमातून झाले. कामगार आंदोलनात व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात 106 शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरुण पाटील, प्रवीण पाटील, किशोर पाटील, लाल पानी पुस्तकाचे लेखक व आयुध निर्माणी भुसावळचे सेवानिवृत कर्मचारी नचिकेत नेमाड़े, सेवानिवृत्त पूर्व कॉ.राजेंद्र बादशाह, राष्ट्रीय स्तरावर खेळात विषेश प्रावीण्य मिळविलेले कामगार शैलेंद्र पवार, दीपक गुप्ता, जेसीएम चतुर्थ सदस्य निवडीबाबत कॉ. प्रवीण मोरे, धनंजय पिंपळे व विवेक नेहेते यांचा सत्कार तसेच एससी एसटी ओबीसी असो.चे साथी राजकिरण निकम, नितेश तायडे यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
वक्त्यांनी सांगितली कामगार दिनाचा इतिहास
कामगार दिनानिमित्त युनियनचे महासचिव कॉ. दिनेश राजगिरे यांनी मे दिवस महाराष्ट्र दिवसाचा इतिहास सांगितला व आजचा दिवस आपल्यासाठी संघर्षाचा, बलिदानाचा दिवस असल्याकारणाने संघटन मध्ये एकजूटता निर्माण करून एक मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले, राजकिरण निकम यांनी एकजूट होऊन लढा देण्यात येईल सांगितले. युनियनचे अध्यक्ष कॉ.आशिष मोरे यांनी संघटनात्मक विचार मांडत संगठन हितासाठी कार्यरत होण्यासाठी सभासदांना आवाहन केले, सूत्रसंचालन गजानन इंगळे यांनी केले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास युनियनचे सर्वस्वी निलेश देशमुख, मीलेश देवराळे, योगेश अंबोडकर, प्रवीण मोरे, मिलिंद ठोंबरे, शेख शकील, नाना जैन, हितेंद्र पाटील, नितीन देशमुख, बिस्मिल्ला तडवी, अनिल लोखंडे, विनोद धाडे, नितीन पाटील, हितेंद्र पाटील, पंकज सोनार, प्रमोद तायडे, संदीप सोनवणे, राजु मंदवाडे, हरिष बविस्कर, रवी पंडीत, प्रमोद तायडे, दीपक वाघ, दीपक आंबेडकर, पंकज बडगुजर, हरीचरण बेलकर, रितेश तायडे, पंकज विसपुते, प्रवीण भोईत, राजुतडवी, महेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.