भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाने उंचावला यशाचा आलेख : बारावी परीक्षेत तीन्ही शाखांचा घवघवीत निकाल
भुसावळ (2 मे 2026) : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा शनिवारी 2 रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. त्यात भुसावळातील कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन महाविद्यालयाची यशाची उज्वल परंपरा जपली. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 98.05 टक्के, वाणिज्य शाखेचा 95.52 टक्के, कला शाखेचा 75.90 टक्के निकाल लागला.
या गुणवंतांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला तुरा
विज्ञान शाखेत प्रथम- गुंजन पंकज अत्तरदे (93.00 टक्के) व व्दितीय रागिणी अजय भारंबे (91.67 टक्के), तृतीय तनश्री श्रीराम भट (88.83 टक्के) आली.

वाणिज्य शाखेत प्रथम आयुष नेमीचंद जैन (94.33 टक्के), व्दितीय- प्रांजल नरेश कुकरेजा (91.83 टक्के), तृतीय- गोपाळ नंदकिशोर अग्रवाल (91.33 टक्के) आला.
कला शाखेत प्रथम- मुस्कान कौर करतार सिंग कांग (91.83 टक्के), प्रशंसा निता बद्रे (91.83टक्के), व्दितीय- अस्मिता ज्ञानेश्वर पाटील (90.83 टक्के), तृतीय- श्रृती सुनील तल्हारी (87.67 टक्के) आली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून कौतुक
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक, चेअरमन महेश देविदास फालक, सेक्रेटरी विष्णू श्रावण चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार सुशीलकुमार नाहाटा. समस्त संचालक मंडळ, प्र.प्राचार्य डॉ.भोजराज हनुमंत बर्हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्र.उपप्राचार्य योगेश एम.पाटील, पर्यवेक्षक स्वाती ए.पाटील, समन्वयक शैलेश बी.पाटील आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यानींनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.