दहावी परीक्षेत भुसावळातील द वर्ल्ड स्कूलचा डंका : शंभर टक्के निकालाची परंपरा कायम


The World School, Bhusawal, Shines in 10th Grade Exams: 100% Result Tradition Maintained भुसावळ (4 मे 2026) : भुसावळातील नामांकीत कोलते फाऊंडेशन संचालित ‘द वर्ल्ड स्कूल’ शाळेने आसीएसई बोर्डाच्या (दहावी) परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
प्रथम- शम्भवी श्रीवास्तव (95.20 %), द्वितीय- दिव्यांश फुलझेले (90.00 %), तृतीय- जगदीश महाजन (88.00 %) आला.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष निशिकांत कोलते, संचालक व सी.ए.रोहित कोलते, शाळेच्या मुख्याध्यपिका पेट्रिश्या ह्यॅसेट यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कौतुक केले आहे शिवाय पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्च्छा दिल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !